Top
babambtctp2016@gmail.com 9225067097 / 7972091839 / 9552011253

१) संपूर्ण महाराष्ट्रातील व महाराष्ट्राबाहेरील कोणत्याही भागातील आजी-आजोबांना प्रवेश दिला जाईल.
२) कोणत्याही जाती धर्मातील आजी-आजोबांना प्रवेश दिला जाईल.
३) प्रवेश घेणाऱ्या व्यक्तिवर कोणत्याही प्रकारचा दबाव नसावा, त्या व्यक्तिची स्वतःची वृध्दाश्रमात राहण्याची तयारी असावी.
४) व्यक्ति थोडीफार तरी चालती फिरती असावी, वा घसरत पुढे सरकत आपले दैनंदिन विधी करता येणारी असावी.
५) वयोवृध्द व्यक्तिस मुले अथवा लांबचे का होईना नातेवाईक असावे.
६) व्यक्तिस HIV किंवा TB नसावा तसेच व्यक्ति मनोरुग्न नसावी.
७) सर्व व्यक्तिंना प्रवेश दिला जाईल.
८) अंध, अपंग, आर्थिक दृष्ट्या दुर्बल तसेच दुष्काळग्रस्त भागातील शेतकरी यांना प्रवेश देताना प्रथम प्राधान्य दिले जाईल.
९) प्रवेश घेणारी व्यक्ति दर महा पैसे भरण्याससक्षम नसेल तर त्याची जबाबदारी इतर कोणतीही व्यक्ति स्वेच्छेने घेऊ इच्छित असल्यास ती मासिक शुक्ल भरुन त्यांचे पालकत्व स्विकारु शकते.
१०) प्रवेश घेणाऱ्या वयोवृध्द व्यक्तिंनी सोबत कपडे, अंथरुन, पांघरुन, पैसे, मोबाईल वा कोणत्याही मौल्यवान वस्तु आणु नये.
११) वध्दाश्रमात त्यांना स्वताचे कपडे स्वतः धुवावे लागणार नाही.
१२) वृध्दाश्रमातील इतर सदस्यांसोबत गैरवर्तन केल्यास, त्यांना वृध्दाश्रमातुन काढुन टाकण्यात येईल.
१३) प्रवेश दिल्यानंतर व्यक्ति आजारी पडल्यास किरकोळ आजारावर आयुर्वेदिक व होमिओपॅथिक औषधोपचार मोफत केले जातील, परंतु आजाराचे स्वरुप गंभिर असल्यास संबधित नातेवाईकांना संपर्क केला जाईल. व पुढची संपूर्ण जबाबदारी नातेवाईकांनी घ्यावी.
१४) कपडे, साबन, ब्रश, पेस्ट व इतर लागणाऱ्या वस्तु पुरविल्या जातील.
१५) प्रवेश देताना सदर व्यक्तिची मुलाखत घेतली जाईल नंतर प्रवेश देण्याचा व नाकारण्याचा निर्णय प्रवेश समिती घेईल.
१६) प्रवेश घेताना कोणतीही माहिती खोटी आढळली तर प्रवेश नाकारला जाईल.
१७) एकुण १०० जणांना प्रवेश दिला जाईल.