Top
babambtctp2016@gmail.com 9225067097 / 7972091839 / 9552011253

आजारपणात किंवा रुग्णालयात उपचार घेऊन घरी परतलेल्या वृध्द व्यक्तिंकडे विशेष लक्ष देण्याची गरज भासते. अनेक वेळा आजारी व्यक्ती घरात असताना अचानक अन्य सदस्यांना बाहेरगावी जावे लागते. अशा परिस्थितीत त्यांना केअर सेंटरमध्ये सोडले जाते.

बाबा वृध्दाश्रम व नर्सिंग केअर सेंटर मध्ये काय आहेत सुविधा ? येथे डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधी ठरलेल्या वेळी दिल्या जातात. नर्स, दोन वॉर्ड बॉय आणि दोन अन्य कर्मचारी २४ तास येथे कार्यरत असतात. रुग्णांना काही त्रास होत असेल तर त्यांच्या नातेवाईकांना कळविले जाते. अडचणीच्या प्रसंगात डॉक्टरांना संपर्क करुन प्राथमिक उपचार केले जातात. अनेकदा नातेवाईक येण्यापूर्वीच त्यांना रुग्णालयात नेतात. सकाळी नाश्ता, दोन वेळेचे जेवण, चहा, दुध आणि विशेष पदार्थही दिले जातात. कोणत्याही परिस्थितीत त्यांना घरची आठवण येऊ नये असाच प्रयत्न केला जातो.

व्यसनग्रस्त अशा आणि इतर कोणत्याही रुग्णाची काळजी घेण्यास सक्षम आहे. हसतमुख चेहऱ्याने, स्वच्छ व अगदी घरगुती वातावरणात रुग्णाची सोय, सकाळचे स्नान, चहा, नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सगळे काही वेळेत देणारे, वेळेवर औषधे मनोरंजनाकरिता गाणी, खेळ, पुस्तके पुरविणारे, कोणासही एकाकी वाटू न देणारे, खऱ्या अर्थाने आपल्या आपल्या नावाप्रमाणे साजेसे सुख देणारे.

वेळ घालविण्यासाठी काय? टिव्ही बसविण्यात आला आहे. पुस्तकेही उपलब्ध आहेत. येथील कर्मचारी या आजी-आजोबांशी गप्पा मारतात. वेळप्रसंगी त्यांना व्हरांड्यात खुर्चीवर बसवून दिले जाते.आमचे बाबा वृध्दाश्रम व केअर सेंटर हे बदलत्या सामाजिक रचनेची जाणीव करुन देणारे ज्वलंत उदाहरण.