आजारपणात किंवा रुग्णालयात उपचार घेऊन घरी परतलेल्या वृध्द व्यक्तिंकडे विशेष लक्ष देण्याची गरज भासते. अनेक वेळा आजारी व्यक्ती घरात असताना अचानक अन्य सदस्यांना बाहेरगावी जावे लागते. अशा परिस्थितीत त्यांना केअर सेंटरमध्ये सोडले जाते.
बाबा वृध्दाश्रम व नर्सिंग केअर सेंटर मध्ये काय आहेत सुविधा ? येथे डॉक्टरांनी सांगितलेल्या औषधी ठरलेल्या वेळी दिल्या जातात. नर्स, दोन वॉर्ड बॉय आणि दोन अन्य कर्मचारी २४ तास येथे कार्यरत असतात. रुग्णांना काही त्रास होत असेल तर त्यांच्या नातेवाईकांना कळविले जाते. अडचणीच्या प्रसंगात डॉक्टरांना संपर्क करुन प्राथमिक उपचार केले जातात. अनेकदा नातेवाईक येण्यापूर्वीच त्यांना रुग्णालयात नेतात. सकाळी नाश्ता, दोन वेळेचे जेवण, चहा, दुध आणि विशेष पदार्थही दिले जातात. कोणत्याही परिस्थितीत त्यांना घरची आठवण येऊ नये असाच प्रयत्न केला जातो.
पुढे वाचा
१) Suction सुविधा व Xygen सुविधा
२) तज्ञ डॉक्टर, इ.सी.जी. रक्तातील साखर चेक करणे, वाफ देणे, अॅडमिटची सोय २४ तास लॅब, निदान व सल्ला (मार्गदर्शन)
३) पॅरालिसीस पेशंट केअर व ट्रिटमेंट
४) बेड रिडेन पेशंट केअर व ट्रिटमेंट
५) उदा- अंगावरुन वार जाणे, हातपायांना मुंग्या येणे, हातपायांना ताकद नसणे हातपाय न उचलणे इ सर्व आजारांवर ट्रिटमेंट दिली जाईल.
(BHMS. EMS.BLS.CCH.CGO.LLB.)